February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.22) :- गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज तर्फे बाल दिनाचे औचित साधून शालेय विद्यार्थांसाठी विविध खेळ आणि कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन म्हणून गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवाने यांच्या हस्ते करण्यात आले. गरवारे उद्योग समूहाचे सहायक प्रकल्प अधिकारी भूषण कोथलकर, गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूजचे केंद्र प्रमुख मिथिन चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी एकूण ४२६ विद्यार्थांनी यात सहभाग नोंदिविला. तीन दिवस घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल रंगोत्सव ही स्पर्धा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी गंमतीशीर खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच तिसऱ्या दिवशी रद्दी पेपर पासून विविध वस्तू बनविणे ही कार्यशाळा घेण्यात आली. तसेच निबंध स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचे बक्षीस वितरण २२ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले. याप्रसंगी सरस्वती बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका जयश्री पिंगळे, यशश्री विद्यालयाचे संचालक बी जी गायकवाड तसेच गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवने, गरवारे उद्योग समूहाचे सहायक प्रकल्प अधिकारी भूषण कोथालकर, गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूजचे केंद्र प्रमुख मिथिन चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बी जी गायकवाड यांनी सांगितले की, अशा कार्यक्रमातून विद्यार्थांमध्ये जिज्ञासा निर्माण होते व विद्यार्थी वेगवेगळे ज्ञान आर्जीत करून स्वतःला सिद्ध करू शकतो. श्री सुतवाने यांनी विद्यार्थांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यामध्ये हैप्पी चाईल्ड इंग्लिश शाळेने सर्वाधिक पारितोषिके पटकावत प्रथम क्रमांक मिळवला. तर दुसऱ्या क्रमाकामध्ये सरस्वती बालक मंदिर यांनी तर तृतीय क्रमांक गोदावरी पब्लिक स्कूल वाळूज यांनी बाजी मारली. तर निबंध स्पर्धेत राजा शिवाजी विद्यालय बजाजनगर यांनी पहिले तीन बक्षिसे प्राप्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण कोथालकर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार मिथिन चव्हाण यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *