वाळुज महानगर, (ता.3) – गंगापुर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वाळुज येथे आमदार प्रशांत बंब व आमदार रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती भाऊसाहेब पदार, उपसभापती सचिन काकडे व सर्व संचालक मंडळ याच्या वतीने वाळुज सर्कल मध्ये फीरते मोफत माती परीक्षणाचे आयोजन सोमवारी (ता.3) रोजी करण्यात आले.
यावेळी उपसभापती सचिन काकडे, कृषी सहाय्यक प्रतिमा भांड, माजी सभापती उदय पाटील, सचिन सुराशे, सतिष वैद्य, तागड मामा, संतोष शिदे, कैलास बिलवाल, बाळु आरगडे, बळीराम वाघचौरे, परसराम आरगडे, ज्ञानेश्वर वाघचोरे, संजु आरगडे, सचिन पानकडे, नाबदे मामा, चिन्नु भाई, सतिष निकम, किरण पाचपुते आदी शेतकरी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजर समिती गंगापुर अंतर्गत येणारे एकुण 82 ग्रामपंचायततीच्या गावातील शेतकर्यांच्या शेतातील मातीचे मोफत मातीचे परीक्षण करण्यात येणार आहे. या मोफत माती परीक्षणाचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन उपसभापती सचिन काकडे यांनी केले आहे.