वाळूजमहानगर – नवरात्री निमित्त गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज तर्फे ग्रामीण भागातील महिला व युवतींना मोफत गरबा व दांडिया प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण हे 17 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन सेंटरचे संचालक सुनील सुतवाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक मयुरी चायल, जान्हवी देशमुख, रिजवाना पठाण, दिव्या ठुबे, वर्षा ढेपे, आशा गोरडे, केंद्रप्रमुख मिथीन चव्हाण, प्रकल्प सहायक भूषण कोथलकर आदी उपस्थित होते.
उद्घाटक काय म्हणतात –
कार्याक्रामाच्या उद्घाटन प्रसंगी संचालक सुनील सुतवणे म्हणाले कि, ग्रामीण भागातील महिलांना हक्काच व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा. या करिता असे विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जातात. आपल्या भागातील महिलांना सुद्धा गरबा आणि दांडियाचा मनसोक्त आनंद घेता यावा या करिता प्रशिक्षणा नंतर गरबा महोस्त्व सुद्धा फक्त महिलां व युवतींसाठी आयोजित करण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेचा आणि महोस्त्वाचा महिलांनी सहभागी व्हावे.
मुख्य प्रशिक्षक मयुरी चायल हिने सभागृहात महिलांना व युवतींना साधे आणि त्यांना सहज जमेल असे प्रकार गरबाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये छकडी, पंचम, दांडिया, वेस्टर्न बॉम्बे, अशा कलात्मक कला गरब्यातील महिलाना प्रशिक्षित करण्यात आल्या. या कार्यशाळेत जवळपास 200 हून अधिक महिलांचा आणि युवतींचा व मुलींनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूजचे केंद्र प्रमुख मिथीन चव्हाण यांनी केले. तर आभार रिजवाना पठाण हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण कुलकर्णी, रामेश्वर वल्ले यांनी परीश्रम घेतले.