
वाळुज महानगर (ता.31) – वाळूज येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात “प्रभु श्रीराम जन्म उत्सव (राम नवमी)” गुरुवारी (ता.30) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने “श्री स्वामी समर्थ साप्ताहिक केंद्र’ “श्री बालाजी मंदिर” येथे सायंकाळी 6 वाजता सर्व स्वामी सेवेकरी, श्रीराम भक्त यांनी मंदिरात पंती, तेल, वातीचा दिवा प्रत्येकी 2 घेवुन आले होते. 
यावेळी दिप प्रज्वलीत करुन दिपावली जशी साजरी करतो तशी “श्री राम नवमी” उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्वानी रामरक्षा पठण करून जय श्रीराम असा प्रभू श्रीरामाचा जयजयकार केला.
या कार्यक्रमास सौरभ वैद्य, किरण पारधे, कैलास धुमाळ, विमल चापेताई, खामकर ताई, अग्रवाल ताई, पवार ताई, स्वप्नाली धुमाळ, राणी शहाणे, काळे ताई आदींसह स्वामी सेवेकरी यांनी सहभाग नोंदवला.
