March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.29) – रिक्षावाले व छोट्याछोट्या उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या ‘पुणे पीपल्स को. ऑप बँक लि. पुणे’ या बँकेच्या 24 व्या शाखेचा उद्घाटन सोहळा वाळूज येथे बुधवारी (ता.28) रोजी मोठ्या उत्साहात झाला.

छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते या शाखेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सहनिबंधक शरद जरे, लोकविकास बँकेचे अध्यक्ष विनायक गवळी, मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण, एम.एस.एफ.सीचे संचालक मिलिंद पाटील, ऍड सुवर्णा मोहिते पाटील, शिवाजी बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, झाडाला पाणी देऊन तसेच फीत कापून वाळूज शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुणे पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून आदरातीथ्य करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष ऍड. सुभाष मोहिते पाटील, सूत्रसंचालन दिपक आहिरे यांनी तर बँकेचे संचालक श्रीधर गायकवाड यांनी आभार मानले.

कार्यक्रमास दैनिक पुढारीचे मराठवाडा युनिट हेड अमोल कोल्हे, जाहिरात व्यवस्थापक आप्पासाहेब गोरे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम भोंडवे, तंटामुक्त गाव समितीचे काकासाहेब चापे पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सर्जेराव भोंड, स्कोडा कंपनीचे विकास डांगे, व्हेरॉक कंपनीचे शत्रुघ्न टाके,

दत्ता भोंडवे, बाळासाहेब रोठे, एल के भराड, दिनकर पवार, अँड अमित धोंगडे, अविनाश गायकवाड, चेतन बोरुले, विश्वनाथ जाधव, अरुण मडके, रमेश वाघ यांच्यासह वाळुज येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, सुभाष नडे, बिपीनकुमार शहा,

निशा करपे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, वैशाली छाजेड, संजीव असवले, विश्वास जाधव, श्वेता ढमाळ, संजय भोंडवे, कौस्तुभ भेगडे, सीए अजिंक्य रणदिवे, उदय जगताप, अरुण डहाके, राजेंद्र गांगर्डे, कैलास पवार, उपसरव्यवस्थापक कैलास पवार, शाखा व्यवस्थापक भगवान चव्हाण यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *