वाळूजमहानगर, (ता.7) – दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त वाळूज येथे शुक्रवारी (ता.6) जानेवारी रोजी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त वाळूज येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरपंच सईदा नबी पठाण व वाळुज ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष हुरखान पठाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास उपसरपंच योगेश आरगडे, ज्येष्ठ पत्रकार बबन गायकवाड, ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हुरखान पठाण यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनपट उलगडून सांगितला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, काकासाहेब चापेपाटील, शेख नदीम झुंबरवाला, अमजद खान पठाण, इस्माईल खान पठाण, नंदू सोनवणे, कारभारी अरगडे, अमोल खैरनार, सचिन मुंडे, ताजू मुल्ला, वाळुज महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामराव भराड, डी पी वाघ, अशोक श्रीखंडे, पांडुरंग गायकवाड, राजू आल्हाट, नानासाहेब जंजाळे, भरत गायकवाड, दादासाहेब तागड, देवचंद भुजंग आदींची उपस्थिती होती.
