वाळूजमहानगर (ता.17) :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र, वाळूज औरंगाबाद यांच्या वतीने बुधवारी (ता.16) रोजी सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
याप्रसंगी कार्यक्रमास सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, डॉ. विशाल सरोदे, डॉ. अरबाज शेख, डॉ. एम. डी. संकपाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत, जनार्दन वाघमारे, श्री सत्यसाई रक्तकेंद्र, एन -5 औरंगाबाद येथील संचालक अरुण वाकडीकर, ललित कला भवन, उस्मानपुराचे कल्याण निरीक्षक दिनकर पाटील या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील, सूत्रसंचालन कामगार कल्याण मंडळ बजाजनगरचे विजय अहिरे यांनी तर आभार वाळूज कामगार कल्याण केंद्राच्या संचालिका अलकनंदा शेळके यांनी मानले.