वाळुज महानगर (ता.9) :- वाळुज येथील श्री स्वामी समर्थ साप्ताहिक केंद्र येथे जागतिक महिला दिवस बुधवारी (ता.8) रोजी विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बजाजनगर ग्रामअभियान महिला सेवेकरी चित्रक काकु तसेच तिसगावच्या ग्रामपंचायत सदस्य रेखा सुर्यवंशी यांनी बालसंस्कार, गर्भसंस्कार, आणि आजची महिला कशी असावी. याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी घेण्यात आलेल्या बाल संस्कार केंद्र कार्यक्रमात लहान मुलींनी जिजाऊ माता, छोटीशी परी, सावित्रीबाई फुले, राधाकृष्ण अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून आल्या होत्या. भावी पिढी कशी असावी याबाबत वेशभूषेचे महत्व यावेळी पटवून सांगण्यात आले. कार्यक्रमास सौरभ वैद्य, कैलास धुमाळ, किरण पारधे, उदावंत मामा, काळे मँडम, पद्माताई गंवादे, विद्या जोशी, शिल्पा धनवट, मुळे मँडम उपस्थित होते. वाळुज केद्रांतील प्रतिनिधी यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
