वाळूज येथे गोकुळाष्टमी उत्साहात साजरी
वाळूज, शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर येथे गोकुळाष्टमीनिमित्त प्रवचन, श्रीकृष्ण जन्मोत्सव, महाप्रसाद व दहीहंडी आदी विविध कार्यक्रमाने गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री कृष्ण मंदिर परिसरात गुरुवारी (ता.18) रोजी रात्री 8.30 वाजता ह.भ. प. विजय महाराज खेडकर यांचे प्रवचन झाले. त्यानंतर रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच शुक्रवारी (ता.19) रोजी महाप्रसाद व दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात बालगोपाळांसह लहान मोठ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश केरेपाटील, राहुल भालेराव, नारायण कवडे, शुभम हुले, रवींद्र पवार, भगवान पांढरे, सुनील पाटील, अभय काळे, दिलीप औताडे, रमेश साळुंके, प्रकाश पाटील, नानासाहेब पंडीत, दत्ता घोरपडे आदींनी परिश्रम घेतले.