वाळुजमहानगर, (ता.25)- वाळूज येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे जिल्हा सरचिटणीस नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी (ता.24) रोजी कवायत पूर्वतयारी घेण्यात आली.
वाळूज येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूल व महाराष्ट्र मराठी पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल, जुनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कवायत पूर्वतयारी घेण्यात आली. यावेळी खडे हात व बैठे हात याचे विविध प्रकार घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक तथा सहारा एज्युकेशन वैद्यकीय सेवा मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अफसर पटेल यांची उपस्थिती होती.