वाळूजमहानगर – भारतातील लुप्त होत असलेली, त्वरित व अतिशय परिणामकारक आयुर्वेदीक चिकीत्सा पद्धतीला पूनरजन्म देणारी स्व.वैद्य. रा.ब गोगटे यांनी विकसित केलेली विद्ध आणि अग्निकर्म चिकित्सा पद्धतीची आठ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
वाळुज येथील ए.एस.क्लब येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत आयुर्वेदाच्या ज्ञात इतिहासात ही पहिली अशी 8 दिवसीय कार्यशाळा आहे, जीथे फक्त विद्ध आणि अग्निकर्म हा विषय अभ्यासला जात आहे. या कार्यशाळेमध्ये स्व. वैद्य रा.ब.गोगटे यांच्या विद्यार्थिनी वैद्य नीता सुमित काला आणि वैद्य सुमित नरेश काला यांनी विश्वा आयुर्वेद चिकित्सालय,
- औरंगाबादच्या वतीने मार्गदर्शन केले. आयुर्वेदात लुप्त होत चाललेली व तात्काळ आराम देणारी ही चिकित्सा पद्धती शिकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरांचल, पंजाब, राजस्थान या आठ राज्यातून 30 आयुर्वेदिक डॉक्टर या कार्यशाळेत 8 दिवस ए.एस.क्लब येथे आले आहेत. यात या वैद्यांनी विविध जुनाट आजार जसे सांध्यांचे आजार, मणक्याचे आजार, जुनाट सर्दी, डोळ्यांचे आजार, पाळीचे विकार, वंध्यत्व आदी व्याधीवर चिकित्सा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी वैद्य.प्रसाद सनगर, वैद्य चांद्रकुमार देशमुख, वैद्य.श्रीकांत मुंदडा आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.