वाळूजमहानगर (ता.26) :- वाळुज येथे गेल्या 25 पासूनपरंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास पिंपरखेडा येथील ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेचे हभप विठ्ठल शास्त्री चनघटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता.25) रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
येथील झेंडा मैदानावर होत असलेल्या या सप्ताह दरम्यान दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथावाचन, सायंकाळी हरिपाठ व दररोज रात्री आठ वाजता कीर्तन होणार आहे. यामध्ये हरिभक्त पारायण विठ्ठल शास्त्री चनघटे, हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी ताई बागुल, हरिभक्त परायण कल्याण महाराज काळे, हरिभक्त परायण अंकुर महाराज साखरे, हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर, हरिभक्त परायण नामदेव महाराज लबडे हे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार आहेत. या सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने शुक्रवारी (ता.2) सकाळी ९ ते ११ या होणार आहे. किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.