
वाळूजमहानगर, (ता.30) – वाळूज महानगर क्रीडा भरती शाखेच्या वतीने हनुमान जयंती निमित्त तिसगाव परिसरात विविध क्रीडा स्पर्धेचे शुक्रवारी (ता.26) रोजी आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर शाखेच्या वतीने क्रीडा भारतीचे विभागीय अध्यक्ष नवीन बगाडिया, प्रांताध्यक्ष पंकज भारसाकळे, मीनाक्षी मुलिया, विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी वय वर्ष 14 व 17 वयोगटातील विद्यार्थ्यांनी 100 मीटर वर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यात अनुक्रमे प्रत्येकी वयोगटातून तीन पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भरत सलामपुरे यांनी केले. तर प्राध्यापक संजय काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन गीते, सचिनदर राय, डॉ. संजय काळे, उमेश डावकर गणेश अवताडे, कांचन काळे, प्रा.अरविंद जैन, रामेश्वर वैद्य, मोनिका सलामपुरे आदींनी परिश्रम घेतले.
