February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.23) – अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्गाच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये 26 व 27 नोव्हेंबर 2023 रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात भव्य “मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून समाज प्रबोधनासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन संयोजकांच्या वतीने गुरुवारी (ता.23) रोजी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.

भावी पिढी सुसंस्कारीत, निर्व्यसनी, सदाचारी आणि कर्तुत्वान अशी निर्माण व्हावी. या उद्देशाने श्री स्वामी सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने सतत विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून “मूल्य संस्कार मेळावा आणि मातृ पितृ पाद्यपूजन सोहळा” होणार आहे.

या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विभागाच्या वतीने उभारली जाणारी ज्ञानदालने होय. त्यामध्ये ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर, नोकरीबाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण दुर्गसंवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी तसेच दहावी, बारावी आणि पदवीनंतर करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या दोन दिवसीय मूल्य संस्कार मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मूल्यसंस्कार मेळावा आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *