February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.18) – रस्ता असो की चौक, मोकळा भूखंड असो की अडगळीची जागा, मुख्य महामार्ग असो की अंतर्गत रस्ता. जिकडे पहावे तिकडे कचराच कचरा. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या कचऱ्याच्या समस्यांनी संपूर्ण वाळूज महानगरला ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घराची कळा अंगण सांगते, आणि गावाची कळा परिसर सांगतो. अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र ती वाळूज महानगरला लागू होताना दिसत नाही. कारण बजाजनगर तसेच सिडको वाळूज महानगर -1,2,3 येथील घरे आलिशान स्वरूपाची आहे. मात्र घराच्या बाहेर निघाले की परिसरात कचराच कचरा दिसून येतो.

बजाजनगर तसेच सिडको वाळूज महानगर येथील कोणत्याही रस्त्याने जा. कचऱ्याचेच ढिगारे दिसतात. या परिसरात कचरा संकलनाची प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे. मात्र ती सबसेल अपयशी ठरली आहे. किंबहुना ती तोडकी आहे. त्यात भरीसभर म्हणजे येथील नागरिकांची कचरा घंटागाडीत टाकण्याची मानसिकताच राहिली नाही. असेच यावरून दिसते. याबाबत सिडको येथील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कचरा संकलनासाठी घंटागाडी आली की, तुरळक नागरिकच त्यात कचरा टाकतात. मात्र बहुतांश नागरिक हे घंटागाडीत कचरा न टाकता घरातून बाहेर जाताना कचरा घेऊन निघतात. आणि रस्त्यात कोठेही फेकून देतात. त्यामुळे रस्त्यावर कचराच कचरा साचल्या जातो. मानसिकता बदलल्याशिवाय बजाजनगर, सिडको वाळूज महानगरातील कचऱ्याची समस्या निकाली निघणार नाही. असे येथील अनेक नागरिक सांगतात.

या ठिकाणी नेहमीच साचतो कचरा –
अण्णाभाऊ साठे चौक ते एनआरबी कंपनी रोडवर, बजाज विहार पाठीमागील पाईपलाईन रोडवर, नायरा पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रोडवर, बजाजनगर येथील नांद्रेआबा चौक, दगदोजीराव देशमुख महाविद्यालयासमोर, अल्फांसा शाळेजवळ, जिल्हा परिषद शाळा वडगाव कॉर्नर, सिडको एलआयसी व एमआयजी गृहनिर्माण सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, भाजी मंडई व स्मशानभूमी जवळील पुल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो.

नागेश कोठारे – सिडको वाळूजमहानगर प्रकल्प अंतर्गत नागरिक हे औद्योगिक परिसरात तसेच ईतर आस्थापनेवर पती व पत्नी दोघे कामाला जात असल्यामुळे कचरा संकलन हे सकाळी 7-3 या दरम्यान ते देऊ शकत नाही. त्यामुळे त्यामुळे घरातून निघताना ती कॅरीबॅग मध्ये कचरा घेऊन निघतात आणि वाटेल तेथे रस्त्यावरच फेकून को बरा करतात. प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकला पाहिजे. सिडको वाळुज महानगर -1, रहिवासी नागेश कुठारे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *