
वाळूजमहानगर, (ता.10) – गर्भ लिंगनिदान चाचणी करताना सापळा रचून डॉक्टरला रंगहात पकडून जेरबंद केले. त्यामुळे गर्भनिदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफास झाला. या उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी वाळूज पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष टीमच्या सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन शनिवारी (ता.10) रोजी गौरव करण्यात आला. 
वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या असून वाळूज पोलीस ठाण्याचा पदभार गीता बागवडे यांनी नुकताच स्वीकारला आहे. 
वाळूज पोलीस ठाण्यात रुजू होताच गीता बागवडे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्य बजावत वाळू माफियांसह अनेक अवैध धंद्यांना आळा घातला. 
या कारवाई बरोबरच बागवडे यांनी गर्भ निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करण्यासाठी शिवाजीनगर परिसरातील अविनाश कॉलनीत सापळा रचून गर्भ निदान करणाऱ्या डॉक्टरला जेरबंद करून रॅकेटचा पर्दाफास केला. 
या उत्कृष्ट कारवाईची दखल घेत पोलीस आयुक्त मनोज लोहीया यांनी वाळूज पोलीस ठाण्याच्या अधिकारी गीता बागवडे यांचा व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोशीन शेख, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, 
पोलीस हवालदार सुखदेव भागडे, अभिमन्यू सानप, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, आनंद वाहूळ या सर्व टिमच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करुन सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन शनिवारी (ता.10) रोजी गौरव करण्यात आला.
