February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.6) – वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यानंतर आता वाळूज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही एक नवजात अर्भक मृत अवस्थेत बुधवारी (ता.6) आढळून आले. त्यामुळे वाळुज औद्योगिक परिसरातसह वाळूज येथेही अनैतिकसंबंध वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील रामराई रोड, उर्दू शाळेसमोरील मुस्लीम कन्नस्थान येथे शिसमच्या झाडाजवळ एक नवजात अर्भक मृत अवस्थेत बुधवारी (ता.6) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मिळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख, वाळूज ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.पी. ढोले, पोउपनि. संदीप शेवाळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून मृत अर्भक घाटीत दाखल केले. साधारण एक महीण्याचे मयत नवजात पुरुष जातीचे हे अर्भक कोणीतरी अज्ञात इसमाने जमीनीत पुरुन मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लाऊन मुलाचा जन्म झाल्याचे उद्देशपुर्वक लपवुन ठेवले. या प्रकरणी पोलीस अंमलदार तुषार राजेंदर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 318 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कब्रस्तानात पुरण्याचा प्रयत्न  –

हे नवजात अर्भक वाळुज येथील उर्दू शाळेसमोरील मुस्लिम कब्रस्तानात पुरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे ते मुस्लिम समाजाचे असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीनेसुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे.

घटनेत दिवसेंदिवस वाढ
गेल्या काही दिवसांपूर्वी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खवड्या डोंगर व एकलहेरा परिसरात अर्भक आढळून आलेले आहे. मरणाच्या दारात असलेले हे अर्भक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आज जिवंत आहे. परंतु वाढत्या अनैतिकसंबंधामुळे अर्भक फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत असल्याने वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *