वाळुज महानगर –
शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा वाळूज परिसरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी मोठ्या साजरा करण्यात आला.
बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक –

वाळूज परिसरातील रामराई, जोगेश्वरी, रांजणगाव, वळदगाव, वाळूज, शिवराई येथे शेतकऱ्यांनी बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला.
पुरणपोळीचा नैवेद्य-
बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलांना व्यवस्थित अंघोळ घालून सजवण्यात आले. सायंकाळी गावाच्या वेशीजवळ सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत बैलपोळा साजरा केला. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरी सर्जा राजाला ओवळत पूजा करत नैवद्य पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला.
सजावटीतून संदेश –

अनेकांनी आपल्या बैलांच्या पाठीवर शेतकऱ्यांना शेती माला संदर्भात भेडसावणाऱ्या समस्या तसेच
राजकीय स्लोगन लिहून सामाजिक व राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकला.
शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सण –
शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा. या बैल पोळ्याच्या सणानिमित्त शेतकरी आपल्या सर्जा राजाला आंघोळ घालून सजवतात. गावातून सवाद्य मिरवणूक काढतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. विशेष म्हणजे बैलपोळ्याला तीन दिवस बैलांकडून कोणतेकामे करून घेतले जात नाही हे विशेष.