वाळूजमहानगर,(ता.12)- किरकोळ वाद झाल्याने पानटपरी चालकाला बाहेर ओढून चाकूने सपा-सपवार करून त्याचा खून केला. ही घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे 11 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे संत शिरोमणी सावता महाराज कमानीजवळ सुनील राठोड वय 42 याची पानटपरी आहे, मंगळवारी (ता.12) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आरोपी शिवा दुधमोगरे, पवन दुधमोगरे या दोन्ही भावंडांनी टपरीचालक सुनील राठोड सोबत पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात दोन्ही भावंडांनी राठोडवर चाकूने साफासफ वार गंभीर जखमी केले.
त्यामुळे रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राठोडला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पसार झालेल्या दोन्ही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, यांचासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, चंद्रकांत कामटे, प्रविण पथरकर यांच्यासह ठशे तज्ज्ञ, स्वान पथक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाई सुरु आहे.