वाळुज महानगर, (ता. 5) – गेल्या अनेक दिवसापासून वातावरणात उष्णता जाणवत होती.
सोमवारी (ता. 5) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन जोराचा पाऊस सुरू झाला.
या जोरदार पावसासह गाराही पडल्या. बोराच्या आकाराच्या या गारा अचानक पडल्याने अनेकांची त्रिधा तिरपट उडाली. या गारामुळे शेतातील उभे पिकाची मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विशेषता कांदा पीक काढणीला आला असून अनेकांचा कांदा शेतात काढलेल्या अवस्थेत पडून आहे.
