February 5, 2026

वाळूज महानगर – वाळुज गणेश महासंघाचा अध्यक्ष पठाण आहे, ही अत्यंत चांगली बाब आहे. आपण सामाजिक सलोख्यातून सण ऊत्सव साजरे करत आहात. इतरांनीही या गणेश महासंघाचा आदर्श घ्यावा. असे प्रतिपादन गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी गुरुवारी (ता.8) रोजी वाळूज येथे केले.

वाळुज गणेश महासंघाच्या गुरुवारच्या आरतीचे यजमान गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी हे होते. यावेळी तहसीलदार यांनी गणेश महासंघाची आरती करून पदाधिकारी व गणेश भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी वाळुज गणेश महासंघाचे अध्यक्ष भैया पठाण, संस्थापक अध्यक्ष बबन गायकवाड, उपाध्यक्ष नंदू सोनावणे, ललित राऊत, अनिल भुजंग, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे पाटील, माणिकदादा राऊत, संदीप पठारे, रवी आढाव पाटील, प्रविण अग्रवाल, सचिन जामधडे, दीपक साबळे, अमोल बोन्द्रे, महेश पवार, हरी काळे, सुशील निकम, ऋषीकेश काळे, युवराज राऊत, अनिकेत वखरे, संतोष कुंजारे, सुशिल निकम, ललीत बोहरा, किरण वखरे आदींसह वाळूज गणेश महासंघाचे पदाधिकारी व गणेश भक्ताची उपस्तिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *