वाळूज गणेश महासंघाचा उपक्रम,
उत्कृष्ट बैल जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन

उत्कृष्ट बैल जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन
वाळूज येथे गणेश महासंघाच्या वतीने बैलपोळ्या निमित्ताने उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट बैल जोडी सजावट, शिस्तबद्ध मिरवणूक आदी निकषांच्या आधारे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक बैल जोडी मालकाला महासंघातर्फे देण्यात येणार आहे.
मारुती मंदिर जुने वाळूज गाव खांब नदी लगत वाळूज येथे शुक्रवारी (ता.26) रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येत शेतकरी बंधूनी सहभागी व्हावे. असे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन गायकवाड, अध्यक्ष भैय्या पठाण, उपाध्यक्ष नंदू सोनवणे, ललित राऊत, सचिव रतन अंबिलवादे, सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोंड, सहकार्याध्यक्ष दीपक साबळे, संघटक नदीम झुंबरवाला, सहसंघटक सचिन मुंढे, कोषाध्यक्ष विजय साबळे, सचिन पानकडे कार्यक्रमाचे व्यवस्थापक अविनाश गायकवाड, प्रवीण अग्रवाल अनिल भुजंग, सल्लागार काकासाहेब चापे, माणिक राऊत, सचिन काकडे, पद्माकर जाधव आदींनी केले आहे.