वाळूजमहानगर, (ता.1) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मध्ये भीषण आग लागली. ही घटना बुधवारी (ता.1) फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळीत धाव घेतली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मध्ये स्वस्तिक नावाचे ट्रान्सपोर्ट आहे. चार शटर लगातार असल्याने येथे बुधवारी (ता.1) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत ट्रान्सपोर्ट मधील माल जळून मोठे नुकसान झाले.
वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान घटनास्थळी मोठा बघ्यांचा जमाव जमला असून शेजारील सर्व दुकाने व लहान मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या आहे.
