
वाळूज महानगर, (ता.2) – ट्रान्सपोर्ट व्यवसायात वापरत असलेला आठ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लंपास केला. ही चोरी 1 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुमारास वाळूज औद्योगिक वसाहती झाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर गारखेडा परीसर ता. जि.छत्रपती संभाजीनगर येथील अभिषेक राजेश जाधव वय 25 वर्षे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे शिवम ट्रान्सपोर्ट सर्विसेसकडे येणाऱ्या मालाची ने-आण करण्यासाठी टाटा 1109 (एम एच 21, एक्स -4421) वापरतात. 8 लाख रुपये किंमतीची ही ट्रक नेहमीप्रमाणे ऋचा इंजिनिअरिंग कंपनीच्या सर्विस रोडवर के सेक्टर येथे उभा असते. 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जाधव यांना सुपरवाईझर सचिन साधु सुरवसे यांनी फोन द्वारे कळविले की, टाटा ट्रक 1109 ही ऋचा इंजिनिअरिंग कंपनी सर्विस रोडवर उभा केलेल्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे तात्काळ येऊन त्या ठिकाणी, आजुबाजूच्या परीसरात तसेच वाळुज औद्योगिक भागात शोध घेतला. परंतु ट्रक मिळुन न आल्याने खात्री झाली की, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतः त्या आर्थीक फायद्यासाठी चोरुन नेली. याप्रकरणी अभिषेक राजेश जाधव यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात कलम 379 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश तारव करीत आहे.
