
वाळूज महानगर, (ता.4) – वाळूज येथील पाणी टंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीने केलेल्या विनंती अर्जाची दखल घेत गरवारे उद्योग समूहातर्फे वाळूज गावाला पाणी पुरवठा करण्यास बुधवारी (ता.3) सुरवात झाली. 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तमराव भोंडवे, गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचीन काकडे, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, पोपट बनकर, दयानंद साबळे, नदीम झुंबरवाला, अमजद खान, रोहीत जाधव, सचिन पानकडे, गोकुळ बोबडे, दिपक ठोके, राजेंद्र सैंदाने, एम.आर. देशमुख, प्रविण कुलकर्णी, रामेश्वर वल्ले, राजेंद्र वाघ यांच्यासह पाणीपुरवठा कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
येथील विंधन विहिरीला पाणी येईपर्यंत म्हणजेच सुमारे दोन महिन्यांसाठी हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दररोज दहा टँकरमधून पाणी आणून ते रामराई रस्त्यावरील ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहिरीत टाकले जात आहे. गरवारे समूहाच्या या स्तुत्य उपक्रमाचे वाळूज येथे स्वागत होत आहे.
