
वाळूजमहानगर, (ता.27) – वाळूजमहानगर पञकार संघाचे मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष आर.के.भराड, मुख्यसल्लागार महेमूद शेख, संदीप चिखले, माजी अध्यक्ष अशोक कांबळे यांच्या उपस्थितीत वाळुज महानगर पत्रकार संघाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी (ता.26) रोजी राबविण्यात आली.

यानिवडणूकीत सर्वानूमते पञकार संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचा प्रस्ताव जेष्ठपञकार संदीप चिखले, किशोर बोचरे यांनी मांडला. त्यास सर्व पञकारांनी अनुमोदन दिले. नवीन पञकार संघाची कार्यकारणी निवङ करण्यात आली. अनुक्रमे अध्यक्षपदी संतोष बारगळ, उपअध्यक्षपदी अशोक साठे, राहुल मुळे, सचिवपदी प्रा.संजय काळे, कोष अध्यक्षपदी निलेश भारती, सहसचिव अभिजीत चौरे, सदस्य ङि.पी.वाघ, राजु जंगले, सल्लागार महेमुद शेख, आर के भराड, संतोष उगले, देविदास ञिबंके, किशोर बोचरे, संदीप लोंखङे, शिवाजी बोङखे, गणेश गाङेकर, भागीनाथ जाधव, रवि गाङेकर, हुरखाँन पठाण, गजानन राऊत, भरत थटवले, शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होती.
