वाळूजमहानगर, (ता.22) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेला शुक्रवारी (ता.21) रोजी शांततेत सुरूवात झाली. या परीक्षेचा पहिलाच पेपर मराठी विषयाचा होता. वाळूजमहानगर येथील बजाजनगर, रांजणगाव (शेणपुंजी), अशा एकूण 11 परिक्षा केंद्रावरून 2 हजार 652 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कुठेही कॉपी किंवा गैरप्रकार दिसून आला नाही.
बजजानगरातील राजा शिवाजी विद्यालय या परीक्षा केंद्रावर 287 विद्यार्थ्यांपैकी 286 परीक्षार्थींनी परिक्षा दिली. शहीद भगतसिंग शाळा या केंद्रावर सर्वच्यासर्व 208 विद्यार्थी परिक्षेसाठी हजर होते. अल्फोन्सा इंग्लीश स्कुलमध्ये 205 पैकी 203 विद्यार्थी हजर तर 2 परीक्षार्थी गैरहजर होते. स्व. भैरमल तनवाणी विद्यालयात 342 विद्यार्थ्यांपैकी 341 विद्यार्थी हजर होते. या केंद्रावर एक विद्यार्थी अनुपस्थित होता.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर सर्व 432 विद्यार्थीनी परिक्षा दिली. तर जिल्हा परिषद शाळा, रांजणगाव (शेणपुंजी) येथे 214 पैकी 213 विद्यार्थीनी परिक्षा दिली. यशवंतराव चव्हाण विद्यालयात 168, श्री शिवाजी विद्यालय येथे 170 तर राजर्षी शाहु विद्यालयात 302 या परिक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थी उपस्थित होते. लालबाहदुर शास्त्री विद्यालयात 160 पैकी 159 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
शहिद भगतसिंग विद्यालय परीक्षा केंद्रावर एकूण 171 पैकी 170 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान कुठेही कॉपी किंवा गैरप्रकार दिसून आला नाही. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने परीक्षा दरम्यान चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.