
वाळुज महानगर, (ता.10) – वाळूज येथे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने कुत्रा चावण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र आरोग्यवर्धिनी केंद्र वाळूज येथे रेबीज लशीचा ठणठणात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.
शहरातील मोकाट कुत्रे पकडून वाळूज परिसरात आणून सोडल्या जाते. त्यामुळे वाळूज व परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ये मोकाट कुत्रे महिला नागरिक व विशेषता बालकांचे लचके तोडतात. कुत्रा चावला की, रेबीज लस घेणे त्या आवश्यक असते. मात्र वाळूज येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे दिवसभरातून जवळपास 20 -25 पेशंट माघारी जात आहे.
असून अडचण नसून खोळंबा –
कुत्रा चावल्यानंतर सुरुवातीच्या 24 ते 72 तासात रेबीज लस घेणे गरजेचे असताना ती वेळेवर मिळत नाही. तसेच शनिवारी कुत्रा चावला तर रविवारी आरोग्य केंद्राला सुट्टी असते त्यामुळे तो रविवारी जाऊ शकत नाही. सोमवारी ही लस उपलब्ध नसल्याने 24 तासाच्या आत घ्यायची कशी? असा सवाल येथील स्थानिक रुग्ण करत आहे. त्यामुळे वाळूज येथील आरोग्य केंद्र गत असून अडचण नसून खोळंबा अशी झाली असेच म्हणावे लागेल.
