वाळूजमहानगर, (ता.24) – प्रेम प्रकरणामुळे घरातून फरार झालेल्या आंतरजातीय प्रेमीयुगलाचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत गुरुवारी (ता.24) रोजी जालना जिल्ह्यात आढळून आले. दोघेही वाळूज परिसरातील असून त्यांनी आत्महत्या केली की, त्यांचा कोणी घातपात केला. या संभ्रमात पोलीस सापडले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,
मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगाडे पोखरी शिवारातील शेत गट क्रमांक 14 मध्ये
वाळूज परिसरातील कैलास काशिनाथ गवई रा.गल्ली नंबर- 3 गांधीनगर, रांजणगाव शेणपुंजी) तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर व महिला मुक्ता रामेश्वर खंडागळे रा. रांजणगाव (शेणपुंजी) संभाजीनगर या दोन्ही प्रेमी युगलाचे मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी (ता.24) रोजी मिळून आले. एकाच वेळी एकाच लिंबाच्या झाडाला दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत असल्याचे लक्षात येताच ही माहिती पोलिसांना देण्यात आली त्यांनी दोघांचेही मृतदेह खाली काढून सामान्य रुग्णालय जालना येथे शवविच्छेदनासाठी दाखल केले. मयताच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून त्यांची ओळख पटली आहे. पुढील कार्यवाही मौजपुरी पोलीस करीत आहोत
दोघेही वाळूज परिसरातील –
कैलास गवई व मुक्ता खंडागळे हे दोन्ही समवयस्क असून दोन्हीही अंतर जातीय आहे. दोघेही वाळूज औद्योगिक परिसरातील आहेत. दोघांचे प्रेम प्रकरण असल्याने ते रांजणगाव (शेणपुंजी) येथून फरार होते.
खून की आत्महत्या –
दोघांच्या प्रेमप्रकरणास घरातील मंडळीचा विरोध असल्याने ते फरार झाले होते. त्यांनी आत्महत्या केली की, यांची कोणी हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी व आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्या दोघांना लिंबाच्या झाडाला आणुन लटकवले. हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मात्र डॉक्टरांचा अहवाल येताच त्यावर पडदा पडणार आहे.
पोलीस दप्तरी नोंद नाही –
दोन्हीही प्रेमी युगल हे वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील असून प्रेमप्रकरणामुळे दोघेही गावातून फरार होते. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी ते फरार किंवा बेपत्ता असल्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे पोलीस दप्तरी त्यांच्या बेपत्ता झाल्याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.
आधारकार्डमुळे ओळख पटली –
आढळून आलेल्या मृतदेहाची मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी पाहणी केली असता मयतांच्या खिशात आधार कार्ड मिळून आले. या आधार कार्ड वरून दोघांचीही ओळख पटली असून ते दोघेही वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील असल्याचे उघडकीस आले.
दोघांचेही नातेवाईक रुग्णालयात –
दरम्यान पोलिसांनी संपर्क केल्याने मयत कैलास गवई याची बायको व मुक्ता खंडागळे हिचा नवरा असे दोघांचेही नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी मृतदेह पाहून ओळखले. विशेष म्हणजे दोघांचेही लग्न झालेले असून ते दोघे काल रात्री रांजणगाव (शेणपुंजी) येथून बेपत्ता झाले होते. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याचे मौजपुरी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे म्हणाले.