February 19, 2026

वाळूज महानगर, (ता.19) – घरातील कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूपतोडून रोख रकमेसह सोन्या, चांदीचे दागिने मिळून 2 लाख 75 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. वाळुज येथे घडलेली ही चोरीची घटना बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोईन मन्सुर सय्यद वय 31 वर्षहे वाळुज येथील भगतसिंगनगर येथे आई- वडील, पत्नी, दोन मुले तसेच लहान भाऊ मतीन मन्सुर सय्यद, त्याची पत्नी व मुले यांच्यासह एकत्र कुटुंबात राहतात. लासुर स्टेशनजवळील सनव माडकी येथे साखरपुडा असल्याने कुटुंबातील सर्वजण मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाला कुलुप लावुन कार्यक्रमास गेले होते. तेथे साखरपुड्याचे कार्यक्रमातच लग्न लावल्याने रात्री उशीर झाल्याने ते येथेच थांबले. बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी 7:45 वाजेच्या सुमारास संजय साळवे यांनी मोईन मन्सूर सय्यद यांच्या घरी चोरी झाल्याचे फोन करुन सांगितले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास –
बंद असलेल्या मोईन सय्यद यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 60 हजार रुपये किमतीचा व 15 ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा नेकलेस, 40 हजार रुपये किमतीची व 10 ग्रॅम वजनाची एक सोन्याची पोत, ज्यात 5 ग्रॅम वजनाचे मनी व 5 ग्रॅम वजनाचा सोन्याचा पत्ता व काळे मणी, 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे हेअरींग 5 ग्रॅम वजनाचे दोन जोड एकुण 10 ग्रॅम, 40 हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या सोन्याच्या 5 अंगठ्या, प्रत्येकी 2 ग्रॅम वजनाच्या एकुण 10 ग्रॅम, 30 हजार रुपये किमतीचे व 15 भार वजनाचे चांदीचे चैन जोड, 20 हजार रुपये किमतीचे लहान मुलांचे चांदीचे 18 कडे, प्रत्येकी अर्धा भाराचे, व कपाटातील 45 हजार रुपये रोख रक्कम. असा एकूण 2 लाख 75 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात इसमांनी चोरून नेला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *