
वाळूजमहानगर, (ता.24) – क्युरिया फार्मा आणि वायफोरडी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार कल्याण केंद्र वाळूज येथे मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिर मंगळवारी (ता.21) रोजी घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील 150 रुग्णांची तज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासणी करून त्यांना मोफत औषधीचे वितरण करण्यात आले.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील क्युरिया फार्मा कंपनीच्या सीएसआर फंडातून या मोफत सर्व रोग निदान शिबिर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाळूज परिसरातील पंधरा गावात हे आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.21) रोजी वाळूज येथे या उपक्रमास सुरुवात झाली.
या प्रसंगी क्युरिया फार्मा कंपनीचे एच आर प्रमुख रवींद्र भागडे, आर एन डी महेश पतंगे, वायफोरडी फाउंडेशन पुणेचे श्याम भोजने यांच्यासह नवीन प्रयास बहुउद्देश संस्थेच्या अंजली खंडाळे, माजी सभापती ज्योती गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे बाजीराव चोरमारे, अविनाश गायकवाड, युवा मोर्चाचे अमोल शिंदे आदींची उपस्थिती होती.

या शिबिरात व्हर्टेक्स हॉस्पिटलच्या दंतरोग तज्ञ डॉ. प्रीती राजगुरू, अल्फा क्लिनिकचे जनरल मेडिसिन तज्ञ डॉ. शेख युनूस, वरद लॅबचे सम्यक कांबळे, कृष्णा ऑप्टिकल वाळूजचे नेत्रतज्ञ ज्ञानेश्वर कदम यांनी डोळे, दात, रक्तदाब, बीपी, दमा, शुगर अशा विविध आजाराच्या जवळजवळ 150 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली.
