February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.29) – दुचाकीवर आलेल्या एका अज्ञात इसमाने अंदाजे 30 वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने सभासद वार करून त्याचा निर्गुण खून केला. ही अत्यंत सणसणाटी घटना ईसारवाडी फाट्यावर गुरुवारी (ता.29) रोजी पाच वाजेच्या सुमारास घडली. सैराट चित्रपटाप्रमाणेच ही घटना असल्याचे समोर येत आहे.

बाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील आरोपी व फिर्यादी हे एकमेकाचे नातेवाईक असल्याचे सांगतात. त्यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद होता. गुरुवारी तारीख 29 रोजी यातील मयत बापू खिल्लारे हा ईसारवाडी फाट्यावर चहा पीत होता. त्याच दरम्यान आरोपी दुचाकीवर आला. त्याने बापू खिल्लारे याला पाहताच कुऱ्हाड घेऊन पाठीमागे धावला. व पाहता पाहता सपासप कुर्हाडीने वार करून भर रस्त्यात त्याचा निर्गुण खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीसांसह सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी लोंढे, पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मयत बापू खिल्लारे या संघटित हलवत आरोपीच्या शोधात पथके रवाना केली. भर रस्त्यात झालेल्या या थरारक घटनेदरम्यान वाळुज महामार्गावरील दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती.

सैराट चित्रपटाप्रमाणे थरार

विशेष म्हणजे याबाबत अशी ही माहिती मिळते की, आरोपीची बहीण फिर्यादीने पळवून आणली होती. या कारणावरून आरोपीच्या मनात राग होता. त्यातूनच त्याने हे निर्घृण हत्याचे कृत्य केले असावे. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी मयत रक्ताच्या थारोळात पडलेला होता. शेजारीच त्याच्या चपलाही विखुरलेल्या होत्या. सैराट चित्रपटासारखाच हा थरार आज पहावयास मिळाला.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *