February 5, 2026

वाळुज महानगर, – दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या सिडको वाळुज महानगर-1 येथील एका कंपनी कर्मचाऱ्याच्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील 20 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 2 लाख 41 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने तसेच बजाजनगर येथील अन्य एका फ्लॅटचा सुद्धा कडीकोंडा तोडून 4 ग्रॅम वजनाचे दागिने मिळून अंदाजे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या दोन्ही चोरीच्या घटना 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा ज्ञानेश्वर शेषराव कांडेकर (41) हा कर्मचारी कुटुंबासह सिडको वाळूज महानगर -1 येथील मधुर कॉलनीतील रिद्धी रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्रमांक 3 येथे राहतो. त्याचे कुटुंब 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फ्लॅट बंद करून दिवाळीच्या खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास ते परत आले असता त्यांना त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाटातील सर्व साहित्य उचकापाचक केल्याचे आणि चोरी झाल्याचे उघडकीस आले. यात अज्ञात आरोपींनी कपाटाच्या लॉकरमधून 20 हजार रुपये रोख, सोने-चांदीचे दागिने आणि एक पेन ड्राइव्ह असा एकूण दोन लाख 41 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
तसेच बजाजनगरमधील भोंडवे पाटील शाळेजवळील फ्लॅट बी-3 मध्ये राहणाऱ्या अंजली अमोल जोशी यांच्या फ्लॅटचा सुद्धा दरवाजाचे अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आणि कपाटात ठेवलेले 4 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी ज्ञानेश्वर कांडेकर यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आतण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *