
वाळुजमहानगर, (ता.8) – घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी असे अनेक गुन्हे करून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार असलेल्या आरोपीस वाळूज पोलिसांनी बुधवारी 8 एप्रिल रोजी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून विविध गुन्ह्यातील 3 दुचाकी, चांदीचे ब्रेसलेट, साड्या, विदेशी दारुच्या बाटल्या असा 3 लाख 7 हजार 280 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळुज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुरनं 72/2026 कलम 305, 331 (3), 331 (4) बी.ए.एस (घरफोडी चोरी) या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे व विशेष पथक करीत होते. हा गुन्हा डोमेगाव येथील आरोपी राहुल कांताराज पवार याने केल्याचे निष्पण झाले होते. त्यामुळे वाळुज पोलीस ठाण्याचे विशेष पथक आरोपीचा शोध मिरजगाव, जामखेड, जि. अहिल्यानगर, इंदापुर, पुणे या भागात घेत होते. परंतु आरोपी वारंवार पोलीसांना चकवा देत होता. 25 मार्च 2026 रोजी राहुल कांताराज पवार यास विशेष पथकाने इंदापुर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करुन गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी तीन दुचाकी, चांदीचे ब्रेसलेट, साड्या, विदेशी दारुच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला.
विविध पोलीस ठाण्यात दाखल होते गुन्हे –
वाळूज पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपी राहुल पवार यांच्याविरुद्ध वाळुज पोलीस ठाण्यात गुरनं 12/2026 कलम 305(अ), 331 (3), 331 (4) बी एन एस, गुरनं 51/2026 कलम 305 (अ), 331 (3), 331 (4) बी एन एस, पोलीस ठाणे अंभोरा जि.बिड गुरनं 240/2025 कलम 303(2) बीएनएस, पोलीस ठाणे वालचंदनगर जि.पुणे, गुरनं 89/2026 कलम 303 (2) बीएनएस, पोलीस ठाणे वालचंदनगर जि.पुणे, गुरनं 99/2026 कलम 309 (4), 3(5) बीएनएस, पोलीस ठाणे वालचंदनगर जि. पुणे. गुरनं 275/2025 कलम 305,331 (4) बीएनएस, पोलीस ठाणे नेवासा जि. आहिल्यानगर गुरनं 215/2026 कलम 303 (2) बीएनएस, पोलीस ठाणे शहापुर इचलकरंजी जि.कोल्हापुर गुरनं 57/2026 कलम 309 (6),331 (4) बीएनएस. असे गुन्हे दाखल असून ते आरोपी राहुल पवार यांच्याकडुन उघड झाले आहे. या गुन्ह्यात एकुण 3 लाख 7 हजार 280 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, पो.अं. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखदेव भागडे, दशरथ खोसरे, पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी केली.
