February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.20) – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे रविवारी (ता.19) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अंदाजे 40 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला. हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) फाट्यावरील शिवसेना कमानी जवळील कंपनीच्या संरक्षण भिंतीजवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. अशी माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलीसांनी धाव घेत त्यास उपचारार्थ रविवारी (ता.19) रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. रंग काळा सावळा, वय अंदाजे चाळीस वर्ष, मळकट कपडे, मध्यम स्वरूपात वाढलेली दाढी, उजव्या हातावर ‘ओम’ सारखे गोंदलेले. असे
अनोळखी असलेल्या या मयत इसमाचे वर्णन आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामचंद्र बिघोत करीत आहे.

ओळख पटवण्याचे आवाहन
मयताच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या इसमाचा मृतदेह घाटीत ठेवण्यात आला असून त्याबाबत कोणास काही माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन वाळुज एमआयडीसी पोलिसांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *