February 5, 2026

वाळुज गणेश महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या हस्ते शनिवारी 27 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना

प्रथम पोलीस निरीक्षक इंगोले यांनी श्रीफळ फोडून व फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वाळूज गणेश महासंघाच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करताना सरपंच सईदाबी पठाण

कार्यक्रमास सरपंच सईदाबी पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज जैस्वाल, मुकेशशेठ बोहरा, गंगापूर पंचायत समितीची माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, उपसरपंच योगेश आरगडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील, वाळूज पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू सानप, वाळुज गणेश महासंघाचे अफरोज पठाण, नंदू सोनवणे, बबन गायकवाड, ललित राऊत, रतन अंबिलवादे, ज्ञानेश्वर शिंदे, सर्जेराव भोंड, सचिन मुंढे, विजय साबळे, माणिक राऊत, ग्रामपंचायत सदस्य संदीप तुपे, दयानंद माने, सचिन काकडे, नंदकुमार राऊत, संजय शिंदे, बबलू पठाण, रवींद्र शिरसाट, संजय भालेराव, पद्माकर जाधव, महेश पवार, उत्तम बनकर, बाबासाहेब पारदे, बाळासाहेब चनघटे यांच्यासह गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आभार मानताना सर्जेराव भोंड

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन गायकवाड, सूत्रसंचालन ललित राऊत तर आभार सर्जेराव भोंड यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *