March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील जी सेक्टर -39/7/1 येथील अनिल पॅकेजिंग या पुठ्ठा बनवणार्या कंपनीला शुक्रवारी (ता.3) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आग लागली या आगीत जवळजवळ 50 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या कंपनीमध्ये अंदाजे 10 हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये पुठ्ठा तयार करण्याचे व साठवण एकाच ठिकाणी असल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढत गेली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझविण्यासाठी वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलाचा 1 व मनपाचे 2 अशा तीन बंबांनी तसेच 8 ते 10 खाजगी पाण्याचे टँकरच्या सहाय्याने अग्निशमन दलाचे प्रमुख

आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुल अजित, हरिभाऊ घूगे, विक्रम भुईगळ, सचिन शिंदे, इरफान पठाण, अक्षय नागरे, परेश दुधे, मयूर कुमावत, वाहन चालक आकाश हुसे, शकर दुधे यांनी या आगीवर जवळजवळ 4.30 तासानंतर नियंत्रण मिळवले.

या आगीमध्ये कंपनीचे अंदाजे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *