वाळूज महानगर, (ता.26) – एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे येथे औद्योगिक सुरक्षिततेसाठी मिळालेल्या अतिरीक्त 4 दुचाकी व 1 चारचाकी वाहनांचा लोकर्पण सोहळा तसेच प्रॉपर्टी मिसींगमधील 100 मोबाईल हॅन्डसेट पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते मुळ मालकांना गुरुवारी (ता.26) रोजी परत देण्यात आले. यावेळी मोबाईल मिळाल्याच्या आनंदात नागरीकांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.
छत्रपती संभाजीनगर परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे यांनी गुरुवारी (ता.26) रोजी पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज येथे वार्षिक भेट दिली.
यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील नागरीकांच्या व औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी उद्योजकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज हद्दीत पेट्रोलिंग करिता 4 दुचाकी, 1 चारचाकी वाहन दिल्याने या वाहनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते झाला.
नवीन वाहने पोलीस स्टेशनला मिळाल्यामुळे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करुन औद्योगिक परिसरातील चोरीच्या घटनेला आळा घालण्यासाठी तसेच दिवसा शाळा महाविद्यालय परिसरात पेट्रोलिंग करून रोडरोमीओ यांना आळा घालण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे.
तसेच पोलीस स्टेशन हद्दीतून मिसींग झालेले 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे मोबाईल हँन्डसेटचा शोध घेवून ते मुळ तक्रारदारांना परत करण्यात आले.
यावेळी मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरीकांनी व्यक्त करत एमआयडीसी वाळूज पोलीसांचे आभार मानले.
यावेळी पोलीस उपायुक्त बगाटे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील व्हॉलीबॉल ग्राउंडचेही करण्यात आले.
हा कार्यक्रम पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे, संदीप शिंदे, सचिन डाके, गणेश गिरी, शिवाजी घोरपडे, सचिन पागोटे तसेच वाळूज एमआयडीसी येथील पोलीस अंमलदार उपस्थित होते.