March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला व संविधान दिनानिमित्त वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करून रविवारी (ता.26) रोजी शहिदांना अभिवादन श्रद्धांजली वाहण्यात आली.

वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील शहीद तुकाराम ओंबळे हॉल समोर झालेल्या या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी संविधान पत्रिकेचे वाचन करून 26/11 चा हल्ला व शहीद झालेल्या पोलिसांविषयी मार्गदर्शन केले.

 

त्यानंतर शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ, सचिन डाके, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी एन कडू, पोलीस अंमलदार अशोक रंधे आदींसह दामिनी पथकांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *