वाळूजमहानगर, ता.26 – 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेला 16 वर्षं उलटली. या दहशतवादी हल्ल्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मंगळवारी (ता.26) रोजी सकाळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सपोनि. मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षकसंजय गीते, अरविंद शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक विनोद आबुज, भाग्यश्री शिंदे, रावसाहेब काकड, बाबुराव पेदावाड, आशोक जाधव, पोह. राजेंद्र उदे, अरूण उगले, सय्यद चाँद, धिरज काबलिये, बाळासाहेब आंधळे, नवाब खान, जयश्री फुके, जयश्री म्हस्के, पोअं. राजाभाऊ कोल्हे, सुरेश कचे, विक्रम वाघ, योगेश शळके, जालिंदर रंधे आदींची उपस्थिती होती.