March 23, 2026

वाळूज महानगर (ता.9) – वाळूज औद्योगिक परिसराततील हॉटेल डिंगडाँगजवळील एका दुमजली घरात सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर पोलीसांनी शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास छापा टाकून दोन महिलांची सुटका करून एक अनोळखी घरमालक, हॉटेल चालक व महिलांना दाबून ठेवणारा एक जण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरोपींच्या ताब्यातून 37 हजार 530 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल डिंगडाँग जवळील एका दुमजली घरामध्ये महिलांना डांबून ठेऊन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज अतुुलकर यांच्या विशेष पथकाला मिळाताच वेदांतनगर ठाण्याच्या पोलीस निरिक्षक प्रविणा यादव, पोउपनि वैभव मोरे यांच्यासह महिला पोलीसांनी बनावट ग्राहक व पंचायत समक्ष शुक्रवारी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास छापा मारला. यावेळी तेथे मिलींद पोपट पवार (वय 20) रा.खिर्डी पोस्ट मनूर, ता. वैजापूर, ललीत विजय बडगुजर (वय 23) रा. साईनगर एन 4, छत्रपती संभाजीनगर असे दोन ग्राहक मिळून आले. तसेच त्यावेळी तेथे दोन महिलाकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले. त्यांची सुटका करून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातुन दोन मोबाईलसह 27 हजार 530 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार देविदास गढवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कुंटनखाना चालक सागर हॉटेलचा मालक विकी हायलिंगे, पीडित महिलांना डांबून ठेवणारा राहुल बनकर रा. रांंजणगाव तसेच एक अनोळखी घर मालक अशा तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅटरिंगच्या कामासाठी बोलावले –
या कुंटनखाण्पोलीसांनीयावर मिळून आलेल्या महिलांची पोलीसांनी चौकशी केली असता कॅटरिंगच्या कामासाठी बोलवून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पिडीत महिलांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *