
वाळुज महानगर, (ता.25) – आयपीसीए लॅबोरेटरीजचे मानव संसाधन विभागप्रमुख डॉ. व्यंकट मैलापुरे यांनी आपला वाढदिवस यंदा एक सामाजिक बांधिलकी जपत वेगळ्या पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला.

दैनंदिन जीवनात मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या अनेक गरजू कुटुंबांकरिता डॉ. मैलापुरे यांनी किराणा साहित्य किट्सचे वाटप केले. यासोबतच परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक छोटीशी झलक निर्माण केली.
सकाळी 10:30 वाजता झालेल्या या उपक्रमाला सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, मित्र परिवार आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करावी, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. “समाजासाठी काहीतरी चांगले करणे हेच खरे सेलिब्रेशन,” असे मत डॉ. मैलापुरे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. 
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भगवान सदावर्ते, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, मनीषा गजभार, प्रतिभा मैलापुरे, संतोष कोटकर, अनिकेत सुरवंशी, अनिकेत मैलापुरे, संकेत मैलापुरे, यश भूताळे आदींचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी त्यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशीलता याला दाद दिली आहे.
