
बजाजनगर, (ता. 3) – वाळूज महानगरातील वळदगाव ता. जि.छत्रपती संभाजीनगर येथे आई तुळजाभवानी मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यानिमित्त गेणमाळ सोहळा उत्साहात व भक्तिभावाने साजरा झाला. त्यानिमित्त रविवार 1 जून रोजी देवीच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 
वळदगाव येथील सुभाष झळके त्यांच्या वतीने गावाजवळच शेतात भव्य श्री तुळजाभवानी मंदिर बांधण्यात येणार आहे. त्यानिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते वळदगाव पर्यंत श्री तुळजाभवानी व श्री काळुबाईच्या मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीची विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या गेणमाळ सोहळ्याचे गुरुवर्य उमेश अण्णा तांगुडे ( पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. रात्री 8 ते 10 पर्यंत महाप्रसाद वितरीत करण्यात आला. त्यानंतर जागरण व इतर धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोल सुभाष झळके, ऋषिकेश शिंदे, नाथाभाऊ शिंदे, महेश गुंड, प्रदीप हापसे, कृष्णा पवार, अभिजित काळे, सचिन महाराज हिवाळे, अभिषेक झळके व वळदगाव येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
