वाळूजमहानगर (ता.15) : – वळदगाव येथे क्रांतीसुर्य, जननायक, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंगळवारी (ता.15) रोजी अभिवादन करण्यात आले.
वळदगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (ता.15) रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सरपंच अमर राजपूत, उप सरपंच संजय झळके, ग्रामपंचायत सदस्य विष्णूभाऊ झळके, अशोक खोतकर, विनोद खोतकर, माजी पंचायत समिती सदस्य तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले,ग्रामपंचायत कर्मचारी रितेश पहाडीया, शेख चाँद पिशा, नितेश चुंगडे, राजु मुसळे, आंगणवाडी कार्यकर्त्या राधा वाकळे, मनिषा झळके, सुनिता मुसळे, ग्रामविकास अधिकारी बळीराम राठोड आदींची उपस्थिती होती.