March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.20) – प्रेम मशीन चालवण्याचा कोणताही अनुभव किंवा माहिती नसतानासुद्धा काम करण्यास भाग पाडल्याने एक कामगार जखमी झाला. हा अपघात बुधवारी 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव येथील वरद इंदर स्ट्राईड या कंपनीतील झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंबे जळगाव येथील वरद इंदर स्ट्राईड या कंपनीतील
ठेकेदार नगीना यादव व सुपरवायझर सुमरत या दोघांनी संदीपकुमार रामभरोस (वय 20) रा. धारा ता. हरीहरपुर जि. मिर्झापुर, राज्य उत्तरप्रदेश (ह. मु. बजाज गेट समोर, बकवालनगर वाळुज ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) या कामगाराला हेल्पर म्हणुन कामाला लावले. विशेष म्हणजे संदीप कुमार याला प्रेस मशिन चालविण्याचा कुठलाही अनुभव व माहीती नसताना सुद्धा त्याला प्रेस मशिन चालविण्याचे सांगीतले. त्यामुळेच बुधवारी 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अपघात होऊन लिंबे जळगाव येथील वरद इंदर स्ट्राईड या कंपनीतील संदीप कुमार रामभरोस हा कामगार जखमी झाला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *