वाळूजमहानगर, ता.24) – आमचे लग्न का करून देत नाही, तसेच शेती वाटून देत नाही. असे म्हणत संगणमत करून 48 वर्षीय वडिलांवर चाकूने वार केल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव (को.) तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील संपत लक्ष्मण वाहुळ वय 48 हे घरी असताना त्यांच्या मुलांनी संगणमत करून आमचे लग्न का करत नाही, आम्हाला शेती का वाटून देत नाही. असे म्हणून वडील संपत वाहुळ यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत चाकुने पाठीवर, छातीवर, पोटावर व हातावर वार करून जखमी केले होते. बुधवारी (ता.8) रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या संपत वाहुळ यांना उपचारार्थ घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात होते. त्यांच्यावर आयसीयु काँट नं. 4 येथे उपचार चालु असताना संपत लक्ष्मण वाहून यांचा गुरुवारी (ता.23) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी प्रकाश संपत वाहुळ वय 26, व पोपट संपत वाहुळ वय 30 यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहे.