February 5, 2026

 

वाळूज महानगर, ( वार्ताहर) – वडगाव (कोल्हाटी) येथे भटके विमुक्त विकास परिषदच्या वतीने वाघरी समाज वस्तीत दिवाळी सनानिमित्त (भाऊबीज) रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी माता भगिनींना साडी व फराळ वाटप करण्यात आले. आनंदी व उत्साही वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात पर्यावरण आयाम प्रमुख व शासकीय जिल्हा अशासकीय सदस्य सर्जेराव वाघ यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाळूज जिल्हा संघचालक अनिल पाटील, पर्यावरण प्रमुख कैलास चव्हाण, संघांचे सेवाप्रमुख पळसकर, स्थानिक कार्यकर्ते मदन काळे, भानुदास पळसकर, भटके विमुक्त विकास परिषदचे छत्रपती संभाजनगर विभाग संयोजक व देवगिरी प्रांत धर्मास्था प्रमुख विजय पवार, महानगर संयोजक दत्तात्रय दंडवलकर यांच्यासह अनेक महिला, पुरुष, मुले, मुली उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *