
वाळुज महानगर – वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 72 मध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून अखंड सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात सांगता झाली.

वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 72 मध्ये शुक्रवारी 28 नोव्हेंबर पासून श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू होता. यात श्रीगुरूंच्या कृपाशिर्वादाने 251 सेवेकऱ्यांनी निष्ठेने व भक्तिभावाने पारायण वाचन पूर्ण केले. शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी पूजा पाठ होऊन या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने मोठ्या उत्साहात झाली. याप्रसंगी परिसरातील असंख्य स्वामीभक्त, मातृशक्ती व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, केंद्र परिसर ‘जय स्वामी समर्थ’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान उमेश दुधाट पाटील यांनी भावनिक साद घालत केंद्र उभारणीसाठी सर्व स्वामीभक्तांनी सढळ हाताने सहकार्य करावे.
अशी विनंती केली. ही सेवा म्हणजे स्वामी चरणी अर्पण केलेली कृतज्ञतेची अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वामी सेवेकरी मंडळासह उमेश दुधाट पाटील, सुरेशकोकाटे, एम. आर. मुके, शिवाजी माकोडे, राजाभाऊ कोकाट, अमोल पाचपांडे यांच्यासह महिला सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
