
वाळूजमहानगर, (ता.3) – वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषेद शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी (ता.2) रोजी कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
अध्यक्षस्थानी सरपंच सुनील काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी डी ए जायभाये, ग्रामपंचायत अधिकारी भीमराव भालेराव, जिल्हा परिषद शाळेचे हरिचंद रामटेके, आरोग्य विभागाचे देशपांडे ,आनंद वाघ यांची उपस्थिती होती. यावेळी विविध कायद्याची कलमे, मुला-मुलींचे जन्मोत्तर, गुणोत्तर प्रमाण, मुलाचा हट्ट धरण्यापेक्षा आता मुलीचा हट्ट धरावा, मुलींसाठी शासनाच्या विविध योजना, गर्भलिंग निदान कायद्याने गुन्हा. याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी मान्यावरांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी गजानन मिसाळ, आकाश मगरे,भाग्यश्री साळवे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अनिता राठोड, रिता माकंर्डे आदिनी परिश्रम घेतले.
