वाळूजमहानगर, 24- वडगाव (को.) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी निवडणूक संदर्भात मतदान जनजागृतीबाबत निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय मतदान दिन मंगळवारी (ता.21) रोजी साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व उपजिल्हा
निवडणूक अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणविभाग शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने वडगाव (कोल्हाटी) येथील
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी निवडणूक संदर्भात मतदान जनजागृतीबाबत निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डॉ. हरिश्चंद्र रामटेके यांच्या हस्ते लेखन साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षक अनिता राठोड, रिता मार्कंडे, विद्या सोनोने, जागृती धाडबळे, लईक शेख, दिपाली काळबांडे, मंगला गाडेकर, हेमलता जाधव, सुवर्णा शिंदे, योगिता देवकाते, सोनाली निकम यांनी परिश्रम घेतले.